Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

परस्पर ट्रक विक्री प्रकरणातील फरार आरोपी अटकेत

aropi 1

जळगाव प्रतिनिधी । सोलापूर जिल्ह्यातून सन २००९ मध्ये साखरेचा ट्रक परस्पर विकल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आगोदरच एकाला अटक केली होती. यातील फरार असलेल्या आरोपीस एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, मुन्ना मोहनलाल परदेशी उर्फ राहूल पारस (रा. वरणगाव) याला असे दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. सोलापूर जिल्ह्यातून साखरेचा ट्रक मूळ मालकाकडे न पोहचविता तो परस्पर विकून टाकल्याची घटना घडली होती़ याबाबत अकलूज पोलीस ठाण्यात दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़ दरम्यान, या प्रकरणात विजय एकनाथ बोदडे (५५, रा. वरणगाव) याला आधीच अटक करण्यात आली होती. मात्र, मुन्ना हा गुन्हा घडल्यापासून फरार झाला होता. एलीसीबीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बापुसाहेब रोहम यांना मुन्ना हा वरणगावातील रामपेठेत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुषंगाने त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरिक्षक कैलास पाटील, अनिल इंगळे, संजय सपकाळे, सुरेश महाजन, रमेश चौधरी, संतोष मायकल, इंद्रीस पठाण अशांनी वरणगावातील रामपेठेत सापळा रचून गुरूवारी मुन्ना परदेशी याला अटक केली. पुढील तपासासाठी त्याला अकलूज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Exit mobile version