Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुरांना वाहून नेणारा ट्रक जप्त : ४० गोवंशाची मुक्तता

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील थोरगव्हाण ते सावदा रोडवर गुरांना वाहून नेणारा ट्रक जप्त करण्यात आला असून यातून ४० गोवंशाची मुक्तता करण्यात आली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास तालुक्यातील थोरगव्हाण ते सावदा रोडवर फिल्टर हाऊसच्या पुढे एमपी ०४ जीबी.९२९१ या क्रमांकाच्या ट्रकमधून गुरांची कोंबून वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार, कारवाई करून सदर ट्रक जप्त करून यातील चालकाला अटक करण्यात आली.

या कारवाईत एकूण ४० गुरांची मुक्तता करण्यात आली असून ट्रक जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सावदा पोलीस स्टेशन गुरन /२०२२, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनीयम १९६० चे कलम ११ (१) (ङ), (च), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनीयम १९७६ चे कलम ५,९,११ महा. पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९, महा. मोटार वाहन अधिनियम १९८९ चे कलम ८३ प्रमाणे मसून बेग मतलुब बेग ( रा. खेल वार्ड-११, कांधला रुरल, ता. किराणा, जिला-शामली राज्य उत्तर प्रदेश ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईमध्ये गुरे आणि ट्रक असा सुमारे १४ लाख २७ हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सपोनि श्री पळे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश अशोक पाटील हे करत आहेत.

Exit mobile version