Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ट्रक-बसच्या टक्करीत लागली आग : २० जणांचा मृत्यू; २१ जखमी

bus truck accident

कन्नौज वृत्तसंस्था । प्रवासी बस आणि मालवाहू ट्रक यांच्यात भीषण टक्कर होऊन झालेल्या अपघातात २० जणांचा मृत्यू झाला. तर सुमारे २१ जण जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी रात्री कन्नौजमध्ये घडला.

कन्नौजमधील गुरसहायगंज येथून जयपूरला जाणार्‍या बसला एका ट्रकने रात्री धडक दिली. ट्रक आणि बसच्या अपघातानांतर बसला आग लागली. दरम्यान, आगीची तीव्रता अधिक असल्यानं बसमधील प्रवाशांना बाहेर पडणं कठीण झालं होतं. त्यामुळे अनेक प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही. यामध्ये २० प्रवशांचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी झाले आहेत. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या घटनेची दखल घेतली असून त्यांनी ट्वीट करून दु:ख व्यक्त केलं आहे. या अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. मृतांच्या कुटुंबीयांप्रती दु:ख व्यक्त करतो आणि जखमी नागरिकांनी लवकर बरं होण्याची मी प्रार्थना करतो, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

Exit mobile version