Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रिपब्लीक वाहिनीच्या सीईओला अटक

मुंबई प्रतिनिधी । टिआरपी घोटाळ्यात दाखल गुन्ह्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लीक वाहिनीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे.

काही वाहिन्या या गैरमार्गाने टिआरपी वाढविण्याचा प्रयत्न करत असल्याच्या आरोपातून मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात रिपब्लीक वाहिनीचाही समावेश आहे. दरम्यान, याच प्रकरणात आता संबंधीत वाहिनीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे.

टिआरपी घोटाळ्यात आजवर १३ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, विकास खानचंदानी याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Exit mobile version