Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळच्या तरूणीला तोंडी तिहेरी तलाकचा प्रयत्न; गुन्हा दाखल

FIR

भुसावळ प्रतिनिधी | येथे माहेर असणार्‍या तरूणीला तिच्या पतीने मोबाईलवरून तोंडी तिहेरी तलाक देण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिच्या पतीसह सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील रहिवासी असणार्‍या तरूणीचा हिंगोली येथील तरूणाशी विवाह झाला होता. यानंतर काही दिवसांमध्येच तिचा छळ सुरू झाला. यातच काही महिन्यांपासून आपल्याला व्यापार करायचा असल्याने मोहरून एक लाख रूपये घेऊन ये अशी मागणी तिला करण्यात आली. यातून पती आणि सासरच्या मंडळीने तिला त्रास देण्यास प्रारंभ केला.

यातच काही दिवसांपूर्वी पतीने शालकाच्या मोबाईलवर फोन करून तीनदा तलाक बोलून तिहेरी तलाक देण्याचा प्रयत्न केला. यानुसार संबंधीत महिलेने हिंगोली पोलीस स्थानकामध्ये तक्रार दिली आहे. यानुसार पती मोईन हबीब गवळी, सासरे हबीब गवळी, सासू नजमा हबीब गवळी, अख्तर हबीब गवळी, शन्नो अख्तर गवळी आणि नसीम या सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version