Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ठाण्यात तिहेरी हत्याकांड

ठाणे-वृत्तसेवा | तिहेरी हत्याकांडाने ठाणे जिल्हा हादरला आहे. पतीने क्रिकेटच्या बॅट डोक्यात घालून आधी पत्नीला संपवलं. त्यानंतर दोन लहान मुलांचाही जीव घेतला. कासारवडवली येथे ही धक्कादायक घटना घडली. आरोपीचे नाव अमित धर्मवीर बागडी असे आहे. मागील तन दिवसांपासून तो भाऊ विकास घधर्मवीर बागडी याच्याकडे राहत होता. 29 वर्षीय अमित याने बायको आणि दोन मुलांना क्रिकेटच्या बॅटने संपवलं. जयवंत निवृत्ती शिंगे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हत्यानंतर आरोपी अमित हा पळून गेलेला आहे, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

आरोपी अमित धर्मवीर बागडी हा मूळचा हरियाणातील खरडालीपुर येथील आहे. तो तीन ते चार दिवसांपासून ठाण्यात भावाकडे राहत होता. अमित बागडी याला दारुचं व्यसन होतं. तो कोणताही व्यावसाय करत नव्हता. घरगुती कारणामुळे हत्या झाल्याचं प्रथमिक महितीमधून समोर आलेय. 29 वर्षीय अमित बागडी याने पत्नी भावना हिला आधी संपवलं. भावनाचं वय 24 वर्ष इतकं होतं. त्यानंतर सहा वर्षांची मुलगी आणि 8 वर्षांच्या मुलालाही संपवलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास धर्मवीर बागडी  हा आरोपीचा सख्खा भाऊ असून तो ठाण्यात साईनगर कासारवडवली येथे 2 वर्षे राहिला होता. त्यानंतर

जयवंत शिंदे चाळ रूम नंबर एक कासारवडवली गाव येथे गेले 7 वर्षापासून राहत आहे. मयत व्यक्ती या आरोपी अमितची पत्नी आणि मुलं आहेत. आरोपी अमित बागडी याला दारू पिण्याचे प्रचंड व्यसन होते. त्यामुळे पत्नी भावना आणि अमित यांच्यात वारंवार भांडणं होतं होती. नवऱ्याच्या दारुच्या व्यसनामुळे ती त्याला सोडून विकास बागडी सोबत राहत होती.

मयत व्यक्ती भावना ही सख्या लहान दिरासोबत वास्तव्यास राहत होती.  घटना घडली त्या ठिकाणी दोन मुलांचे सोबत राहत होती. गेले तीन दिवसापासून आरोपी मयत व्यक्ती हिचा पती आणि दोन मुले यांना भेटण्यासाठी म्हणून घरी आला होता. त्यांच्यासोबत  तो राहत होता. आज सकाळी आरोपीचा भाऊ विकास बागडी हा नेहमीप्रमाणे सात वाजता त्याच्या हाउसकीपिंगच्या कामासाठी गेला. त्याच्यानंतर साधारण साडेअकराच्या सुमारास तो घरी परतला, तेव्हा त्याला घरात भावना तसेच दोन मुले हे मृत अवस्थेत आढळून आले. त्यांच्या डोक्याजवळ क्रिकेटची बॅट दिसून आली. कासारवडवली पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक शशिकांत रोकडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Exit mobile version