Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाबली विजय चौधरींची संवेदनशीलता : पीडित कुटुंबाला दिली बक्षिसाची रक्कम !

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नुकतेच कॅनडातील जागतिक पोलीस स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारे ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांनी गोंडगाव येथील पिडीत कुटुंबाला मदतीचा हात पुढे करून आपल्यातील संवेदनशीलता दाखवून दिली आहे.

आपल्या महाराष्ट्र राज्याचे ट्रिपल केसरी व डीवायएसपी व आंतरराष्ट्रीय भारतीय गोल्डमेडललिस्ट विजय चौधरी यांनी गोंडगाव गावी चिमुकलीच्या घरी सात्वंनपर भेट दिली. या भेटीत त्यांनी अलीकडेच कॅनडातील आंतरराष्ट्रीय गोल्ड मेडलिस्ट बरोबर मिळालेले एक लाख रुपये मानधनाची रक्कम या कुटुंबाला मदत म्हणून दिली. त्याच ठिकाणाहून उज्वल निकम साहेबांशी फोनवर चर्चा करून या चिमुकलीची केस तुम्ही लढवा अशी विनंती केली,व चिमुकलीच्या वडिलांना धिर देत सांत्वन भेट घेतली व चिमुकलीच्या वडिलांकडूनच मेडल गळ्यात टाकून खर्‍या अर्थाने चिमुकलीला श्रद्धांजली अर्पण केली.

वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स २०२३ विनीपेग कॅनडा येथेे झालेल्या कुस्ती स्पर्धेत १२५ ज्ञस वजन गटात स्वर्णपदक मिळून विश्वविजेता झालेले विजय चौधरी गोंडगाव नगरीत सर्व मित्र परिवारासह घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी सर्व घटना चांगल्या प्रकारे समजून घेतली व डीवायएसपी या पदावर असल्याने वरिष्ठांशी चर्चा करून निश्चितच या घटनेस सहभाग घेऊन गुन्हेगारास फाशीची शिक्षा होईलच यासाठी प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली.

वास्तविक पाहता कॅनडातील स्पर्धेत जगज्जेतेपद पटकावल्यानंतर विजय भाऊ चौधरी यांची भव्य दिव्य अशी मिरवणूक निघणार होती. तथापि, गोंडगाव मधील अशी घटना माहिती पडतात सर्व कार्यक्रमत्यांनी रद्द केले व गोंडगाव येथे घटनास्थळी येऊन चिमुकलीच्या परिवाराचे सात्वन करून आर्थिक सहकार्य केले. या माध्यमातून त्यांनी आपल्यातील संवेदनशीलता दाखवून दिली आहे.

Exit mobile version