Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांना अभिवादन

Image Credit: Live Trends News

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय सण- उत्सव समिती तर्फे लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस युवा नेते धनंजय चौधरी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व माल्यअर्पण करून अभिवादन करण्यात आले. लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी राजकरणात अतिशय दिशादर्शक असे कार्य केले आहे, महाराष्ट्राच्या मंत्री मंडळात शिक्षण, वित्त, नियोजन, महसूल, पाटबंधारे, ऊर्जा, वण आरोग्य, नगरविकास व सांस्कृतिक कार्य विभाग या विभांत केलेल्या कामातून त्यांच्यात जनसेवेची भावना किती तीव्र होती हे दिसून येते.म्हणून आजही त्यांच्या कार्याचे उदाहरण दिले जाते.

बालभारती ची स्थापना, एक सूर एक ताल, सातपुडा विकास, आदिवासी विकास, सिंचन प्रकल्प विकास, डोक्यावरून मैला वाहण्यावर बंदी, श्वेत पत्रिका, अशी अनेक हिताची कामे करत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा जनतेच्या मनावर कायमस्वरूपी उमटविला आहे. विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा दिली आहे. अमेरिकेतील ’संयुक्त राष्ट्र संघ’ च्या सभेत हिंदी भाषेला विश्वभाषे चा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न अविस्मरणीय असल्याचे याप्रसंगी नमूद करण्यात आले.

या कार्यक्रमाला तापी परिसर विद्या मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष एस.के.चौधरी, चेअरमन लीलाधरशेठ चौधरी, संस्थेचे पदाधिकारी नंदकुमार भंगाळे, एम.टी. फिरके, संजय चौधरी प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.उत्पन्न चौधरी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी व परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सण उत्सव समिती प्रमुख डॉ.एस.एल. बिर्‍हाडे, एन.एस.एस. सहायक कार्यक्रमाधिकारी प्रा.शेरसिंग पाडवी व महाविद्यालयाचे कर्मचारी राजेंद्र तायडे,ललित पाटील, प्रमोद अजलसोंडे,पवन अजलसोंडे,शेखर महाजन,नितीन सपकाळे, प्रकाश भुरुड,हेमंत चौधरी,विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Exit mobile version