Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावात एक शाम शहिदो के नाम कार्यक्रमाचे आयोजन ( व्हिडीओ )

WhatsApp Image 2019 03 05 at 8.44.10 PM

चाळीसगाव (प्रतिनिधी)। पुलवामा येथील दुर्घटनेत भारतीय जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी शहरातील डॉ.सुनिलदादा राजपूत मित्र मंडळ व शहीद जवान स्मृती वंदन स्मृती समितीच्या वतीने दिनांक १० मार्च रोजी गीत संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी डॉ.सुनिल राजपूत,दैनिक ग्रामस्थचे संपादक किसनराव जोर्वेकर,पत्रकार संघाचे अध्यक्ष आर.डी.चौधरी,सचिव एम.बी.पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

दिनांक १० मार्च रोजी सायंकाळी ७ शहरातील देवकर मळा,लक्ष्मीनगर येथे सामूहिक श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याप्रसंगी सुप्रसिद्ध गायक प्रमोद सरकटे (मुंबई) आपल्या चमूसह देशभक्तीपर गीतगायन सादरीकरण करणार आहेत.शहरासह तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शहीद जवान स्मृती वंदन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. सामुहिक श्रध्दांजलीपर गीत संध्या कार्यक्रम कुठलाही राजकीय, धार्मिक संघटनाकिंवा कुठल्याही पक्षाशी निगडित नसून देशप्रेमापोटी साकारण्यात आलेला असून यात देशप्रेमाने ओतप्रोत भरलेले संस्कार व राष्ट्रहिताची जाण या माध्यमातून प्रकट व्हावी म्हणून गीतसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे डॉ.सुनिल राजपूत यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी डॉ.शैलेंद्रसिंग पवार, डॉ.संतोष मालपुरे, अनिल मालपुरे, प्रितेश कटारिया, हरेश जैन, राहुल वाकलकर, प्रविण जाधव, राहुल पाटील, स्वप्नील कोतकर आदी समिती सदस्यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रदीप भांडारकर, हिम्मत पटेल, कांतिलाल पटेल, आर्की संजय चौधरी, भरत मेहता, प्रवीण बागड, राजेंद्र अमृतकर, दिपक पाटील आदी उपस्थित होते.

पहा :- डॉ. सुनील राजपूत यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ.

Exit mobile version