Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाड्यावर आदिवासी महिलांचा साडीचोळी भेट देऊन सन्मान

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । नवरात्री उत्सव म्हणजे नऊ रंगाच्या ९ साड्या परिधान करण्याचा उत्सव होय. त्यामुळे हा उत्सव सातपुडा पर्वताच्या पाडा वस्तीवर राहणाऱ्या आदिवासी गोरगरीब महिलांनी देखील साजरा करावा, यासाठी शिवशंभू संघटनेकडून आदिवासी महिलांना साडी चोळी भेट देण्यात आली.

संघटनेच्या साकरे येथील युवती प्रदेशध्यक्ष कविता पाटील व युवती विभागाच्या यावल तालुकाध्यक्ष दिव्या पाटील यांनी आदिवासी पाड्यांना जाऊन साडी चोळी भेट दिली.

यावेळी सणाच्या निमित्ताने आपल्याला एका सामाजीक संघटनेच्या माध्यमातुन मिळालेल्या साडी चोळीमुळे गोरगरीब महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले वंचित महिलांना या उत्सव निमित्त आपण साडी चोळी भेट दिली पाहिजे असा सामाजिक उद्देश समोर ठेवत यांनी हा उपक्रम राबवण्यात आला. नवरात्रीनिमित्त आदिवासी पाडा गायरान येथील महिलांना साडीचोळी देऊन सन्मान केला या वेळी शिवशंभु संघटनेचे मयूर पाटील व कल्पेश पाटील आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Exit mobile version