Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आदिवासी टोकरे कोळी जमातीचा लढा यशस्वी : मिळणार जात प्रमाणपत्र

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आदिवासी टाकरे कोळीचे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ बाविस्कर यांच्या आंदोलनाला यश आले आहे. आता अमळनेरच्या प्रांताधिकारी कार्यालयातून जातीचे प्रमाणपत्र मिळणार असल्याने बाविस्कर यांचे अन्नत्याग आंदोलन आज मागे घेण्यात आले आहे.

दि. ८ मे पासून अमळनेर येथील प्रांत कार्यालय समोर आदिवासी टोकरे कोळीचे जातप्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळावे यासाठी चोपडा महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्क प्रमुख जगन्नाथ बाविस्कर गोरगावलेकर यांनी समाज बांधवांसह तीव्र अन्नत्याग सत्याग्रह सुरू केलेला होता. संबंधित विभागाचे अधिकारी यांनी पाचव्या दिवशी याबाबत दखल घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी कैलास कडलक यांनी आज अखेर जेवढे प्रलंबित प्रकरणे असतील त्यांना टोकरे कोळी जातीचा दाखला देण्यास सुरुवात केली, यामुळे अमळनेर व चोपडा तालुक्यातील शेकडो समाज बांधवांना टोकरे कोळीचे (एस.टी.) दाखले मिळणार आहेत.

यामुळे कोळी समाजाचे नेते जगन्नाथ बाविस्कर यांनी केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाचा प्रयत्नांना विशेष यश मिळाले , त्यांचे जिल्हा व राज्य भरातून कौतुक होत आहे. प्रत्येक प्रांत कार्यालयातून असे दाखले मिळून देण्यासाठीही त्यांचे विशेष प्रयत्न राहणार आहेत.

दरम्यान, जगन्नाथ बाविस्कर आणि सहकार्‍यांचे उपोषण पाचव्या दिवशी प्रांताधिकारी कैलास कडलक यांच्या उपस्थितीत सोडण्यात आले. कडलक यांनी जगन्नाथ बाविस्कर यांना सरबत देऊन उपोषण सोडण्यात आले. याप्रसंगी ऍड. गणेश सोनवणे, माजी पोलीस अधिकारी राजेंद्र रायसिंग, बाळासाहेब सैंदाणे , योगेश बाविस्कर, नामदेव येळवे, गोपाळराव सोनवणे, शुभम सोनवणे, प्रकाश खन्ना, गुलाबराव बाविस्कर, प्रल्हाद कोळी, लखीचंद बाविस्कर, हिलाल सैंदाणे, सुखदेव कोळी, रामचंद्र सपकाळे, कैलास सोनवणे, गोविंदा कोळी, एस कुमार पेंटर, गोपाळ बाविस्कर, विठ्ठल कोळी, गोपीचंद कोळी, प्रशांत सोनवणे, राकेश कोळी, चंद्रकांत कोळी, वसंत कोळी, मनोज कोळी, मनोहर साळुंखे, पंकज बाविस्कर, विजय सैंदाणे, सागर कोळी, भूषण कोळी, डॉक्टर भिकन शिरसाट, गणेश कोळी, वैभवराज बाविस्कर, भाऊसाहेब बाविस्कर, समाधान सोनवणे, रामभाऊ बाविस्कर, डॉक्टर गोकुळ बिराडे, विशालराज बाविस्कर, निर्मला पाटील, आशाबाई बाविस्कर, सावित्रीबाई बाविस्कर, निर्मला बाविस्कर, कस्तुरबाई बाविस्कर, यांचे सह तालुका व जिल्हा व जिल्हा बाहेरील समाज बांधव, पदाधिकारी उपस्थित होते.

आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या वतीने ऍड. गणेश सोनवणे, युवा संघटक शुभम सोनवणे यांनी कायदेशीर रित्या बाजू मांडून सामाजिक दर्जा नुसार व कायदेशीर पुरावे मांडून कोळी नोंदीवरून टोकरे कोळी जमातीचे स्पष्टीकरण केले. सदर स्पष्टीकरण मा.प्रांत अधिकारी श्री.कैलास कडलग साहेबांनी समजून घेतले असता जमातीला साठ जातीचे दाखले निर्गमित केले. साहेबांच्या जमातीविषयी असलेल्या न्यायिक व सकारात्मक भूमिकेचे राज्यभरातून आदिवासी कोळी जमातींनी आभार व्यक्त केले. सर्व आदिवासी टोकरे, महादेव, मल्हार कोळी जमात बांधवानी सविधानाचा व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा, आद्यकवी महर्षी वाल्मिकींचा , छत्रपती शिवरायांचा नावाचा जयघोष करत उपोषणाची सांगता करण्यात आली. शासनाचे, प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले.

अन्नत्याग सत्याग्रह प्रसंगी कोळी महासंघ व कोळी समाज पंच मंडळ अमळनेर यांचे विशेष सहकार्य लाभले. या प्रसंगी पोलीस अधिकारी राकेश जाधव, व त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला. या संदर्भात, जगन्नाथ बाविस्कर म्हणाले की, मी आणि माझे सहकारी हे समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी सतत लढत राहतील. समाजासाठी वाटेल ते करू, जिंकू किंवा मरू यातत्त्वनुसार हा लढा यशस्वी झाला आहे. यापुढेही समाज बांधवांसाठी असाच लढत राहील असे महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्क प्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांनी म्हटले आहे.

Exit mobile version