Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यूपीएससीची तयारी करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक सहाय्य

मुंबई वृत्तसंस्था । केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षेची व मुलाखतीची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी या वर्षापासून आर्थिक सहाय्य करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये तसेच अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांचे प्रशासकीय सेवेत प्रमाण वाढावे, यासाठी आदिवासी विकास विभागाचे मंत्री अॅड. के.सी.पाडवी यांनी ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

या योजनेअंतर्गत यूपीएससीच्या पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या 25 व मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीची तयारी करणाऱ्या 25 अशा अनुसूचित जमातीमधील एकूण 50 उमेदवारांना ही आर्थिक मदत मिळणार आहे. 

या अंतर्गत परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दरमहा 12 हजार रुपये विद्यावेतन व 14 हजार रुपये पुस्तक खरेदीसाठी असे एकूण 26 हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अॅड. के.सी. पाडवी यांनी दिली.

 

Exit mobile version