Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

Missing : आदीवासी तरूणी घरातून बेपत्ता

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचोली येथून २० वर्षीय तरूणी बेपत्ता झाली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील चिंचोली येथे विटा थापण्याच्या कामाकरीता वाघझिरा येथील देवराम गुमान पावरा हे आपल्या कुटुंबियासह  आदीवासी कुटुंबिय गावातील सार्वजनिक विद्यालयाजवळ वास्तव्याला आहे. रविवारी देवराम पावरा यांची मुलगी अनिता देवराम पावरा (वय-२०) ही सोमवारी २५ सायंकाळी ६ वाजता सुमारास काहीही न सांगता गेली. रात्री उशीरा न आल्याने परिसरात तिचा शोधाशोध केली परंतू तरूणी कुठेही आढळून आली नाही. मंगळवारी २६ एप्रिल रोजी देवराम पावरा यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि अजिज शेख, पोहेकॉ नरेंद्र बागुले, श्याम पवार करीत आहे.

Exit mobile version