Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे जनजाति डी-लिस्टींग जिल्हा संमेलन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जनजाति सुरक्षा मंच, जळगावच्या वतीने येथील धनश्री चित्र मंदिरात धर्मांतरित जनजाति डी-लिस्टींग जिल्हा संमेलन नुकतेच आयोजित करण्यात आले होते.

संमेलनाच्या अध्यक्षस्थानी देवगिरी कल्याण आश्रमचे अध्यक्ष चैत्राम पवार होते तर प्रमुख वक्ते म्हणून पश्चिम महाराष्ट्र जनजाती सुरक्षा मंचचे सहसंयोजक एडवोकेट किरण गबाले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवपंथी कलीम महाराज , सुनिता राणे, गंगुबाई बारेला व्यासपीठावर उपस्थित होत्या. कार्यक्रमापूर्वी आदिवासींच्या बांधवांच्या पारंपरिक वेशभूषेत व पारंपरिक वाद्याच्या गजरात शहरातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत धर्मांतर केले-आरक्षण गेले यासह विविध धर्मांतरीत आदिवासी विरोधात घोषणा देण्यात आल्यात.

धर्मांतरित आदिवासी शासनाच्या विविध योजनेसह त्या त्या धर्माचे लाभ घेत असल्याने धर्मांतरित झालेली व्यक्ती ही जनजातीचा दुहेरी लाभ घेत असल्याने, संविधानामध्ये संशोधन करून अनुसूचित जनजाति आदेश 1950 मध्ये(डी-लिस्टींग) जनजाति सूचीतून हटवण्याचा कायदा करावा यासाठी जनजाती सुरक्षा मंचच्या वतीने उच्चस्तरिय पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे मंच चे सहसंयोजक एडवोकेट किरण गबाले यांनी येथील धनश्री चित्र मंदिरात जिल्ह्यातील जनजाति प्रवर्गाच्या जिल्हा मेळाव्यात बोलताना सांगितले.

एडवोकेट गबाले यांनी पुढे बोलताना सांगितले की, अनुसूचित जमातीच्या काही कुटुंबीयांनी धर्मांतर केले. मात्र धर्मांतरित केल्यानंतरही त्यांचे दुहेरी लाभ सुरू आहेत शासकीय योजनेच्या लाभासह ते त्यांच्या धर्मातील लाभ घेत असल्याने जनजाती प्रवर्गातील लाभ शासनाने त्वरित बंद करावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही आमिषाला बळी न पडता आदिवासी बांधवांनी धर्मांतर करू नये असेही आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले. चैत्राम पवार यांनीही आपल्या मनोगत व्यक्त करतांना सांगीतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक काशीराम बारेला यांनी केले तर सूत्रसंचालन दिलावर तडवी यांनी केले.

कार्यक्रमास जामन्याचे  पोलीस पाटील भरत बारेला, साहिल तडवी यासह मंचचे सदस्य , अमळनेरचे प्रमोद पवार, चोपड्याचे रामलाल बारेला, जामसिंग बारेला, रूपसिंग बारेला, जामनेरचे विमलताई मोरे, हिंगोलीचे कलीम बारेला, बोदवड चे दीपक तोरे, एरंडोल चे भाईदास सोनवणे, एडवोकेट जास्वंती भंडारी, प्रदीप कुलकर्णी, किशोर कुळकर्णी, यांचेसह यावल, रावेर, चोपडा, मुक्ताईनगर ,जिल्ह्यातील आदिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी शैक्षणिक क्षेत्रात दारिद्रयरेषेखालील जिवन जगणाऱ्या आदीवासी कुटुंबातील तरुणांनी मिळवलेल्या यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते करन ज्ञानसिंग बारेला, प्रल्हाद दुरसिंग बारेला, कुशाल बारेला आणी मुत्रीकार कमलेश बारेला यांचा व त्यांचा कुटुंबाचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आले.

 

Exit mobile version