Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘रहा अपडेट’ व्हाटस्अप ग्रुपच्या माध्यमातून ‘वृक्ष लागवड व संवर्धन’ मोहीम

69061b33 9b28 4e50 819e fbf86217014f

 

चाळीसगाव (प्रतिनिधी) प्रचंड प्रमाणावर झाडांची झालेली कमतरता आणि पावसाचे होणारे कमी प्रमाण पाहता चाळीसगाव शहरातील ‘रहा अपडेट’ या व्हाटस्अप ग्रुपच्या माध्यमातून ‘वृक्ष लागवड व संवर्धन’ मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.

 

चाळीसगाव शहरात दिलीप घोरपडे व मुराद पटेल यांच्या मार्फत चालविल्या जाणाऱ्या ‘रहा अपडेट’ या व्हाटस्अप ग्रुपच्या माध्यमातून नागरिकांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षाची लागवड करून, त्या झाडाचे संगोपन करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच देऊन पुढील वर्षी झाडाचा व संबंधित व्यक्तीचा वाढदिवस सोबत साजरा करण्याची संकल्पना आहे.

 

या संवर्धन मोहिमेची सुरुवात आज चाळीसगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आली. यावेळी मानोरकर यांना वाढदिवसानिमित्त वृक्ष भेट देऊन त्यांच्या हस्ते नगरपालिकेच्या आवारात वृक्षाची लागवड करण्यात आली. नगरपालिका कर्मचाऱ्यांनी या वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी घेऊन पुढील वर्षी या वृक्षांचा वाढदिवस आम्ही साजरा करू, असा शब्द दिला आहे.

Exit mobile version