Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वैजापूर वनपरिक्षेत्रात आदिवासी गौरव दिनानिमित्त वृक्षारोपण

चोपडा प्रतिनिधी । श्री संत सावता माळी युवक संघ चोपडा शहर, चोपडा तालुका कार्यकारिणी व वनपरिक्षेत्र वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी गौरव दिन व क्रांती दिनाचे औचित्य साधून वैजापूर परिक्षेत्रातील मुळ्यावतार याठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पालन करून वृक्षारोपण करण्यात आले.

हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान संघाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सुरेश महाजन होते व उद्घाटन संघाचे खान्देश विभागीय अध्यक्ष संजयकुमार महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात खान्देश विभागीय संपर्क प्रमुख समाधान माळी यांनी श्री संत सावता माळी युवक संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध समाजपयोगी उपक्रमाबद्दल माहिती दिली.

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी वैजापूर वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान सोनवणे, खान्देश विभागीय उपाध्यक्ष लक्ष्मण माळी, संपर्क प्रमुख समाधान माळी, जिल्हाध्यक्ष सुरेश लहासे, शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रा.रविंद्र महाजन, धुळे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जाधव, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष अल्केश महाजन, कार्याध्यक्ष महेंद्र महाजन, प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र महाजन, धरणगाव तालुकाध्यक्ष निलेश महाजन, शिंदखेडा शहराध्यक्ष केशव माळी, धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक महाजन, मेलाने येथील सामाजिक कार्यकर्ते प्रताप पावरा, प्रल्हाद पाडवी, प्रमोद बारेला,जेकराम बारेला सर तसेच विविध गावांचे सरपंच उपसरपंच व आदिवासी बांधव उपस्थित होते.

याप्रसंगी वृक्ष लागवड करण्यासंदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी समाधानजी सोनवणे यांनी जंगलातील नैसर्गिक साधनसंपत्ती विषयी व जंगलातील विविध प्रकारच्या वृक्षां विषयी माहिती देत शास्त्रशुद्ध पद्धतीने वृक्षांची लागवड कशी करावी याचे मौलिक प्रात्यक्षिक करून दाखविले. वृक्ष, झाड-झुडपांचे मनुष्य जीवनात फारच महत्व आहे. सर्व सजीवांना जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे ऑक्सिजन. हा आपल्यास वृक्षांकडून मिळतो तर आपण आपल्या उच्छवासाद्वारे सोडलेल्या कार्बन डायऑक्साईड चे अन्नात रूपांतर करतात. तसेच पडणारा पाऊस , इंधन , औषधी, भाजी, कागद, फळे, लाकूड इ अनेकविध बाजुंनी वृक्ष आपणास मदत करीत असतात. आज वृक्ष रोपण करून संवर्धन करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन खान्देश विभागीय अध्यक्ष संजयकुमार महाजन सर यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांनी श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य चोपडा शहर, तालुका व वनपरिक्षेत्र वैजापूर याचे वतीने आदिवासी गौरव दिनानिमित्त वृक्षारोपण आयोजनाचे कार्य कौतुकास्पद आहे. वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे यापुढे ही युवक संघाच्या माध्यमातून असेच विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्याचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्यात करू असे प्रतिपादन केले.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
शहराध्यक्ष रोहित माळी, तालुकाध्यक्ष समाधान महाजन, तालुका उपाध्यक्ष जितेंद्र महाजन, महेंद्र माळी, शहर उपाध्यक्ष विठ्ठल माळी, राकेश माळी शहर कार्याध्यक्ष नरेंद्र महाजन, तालुका कार्याध्यक्ष अरुण महाजन, तालुका सचिव दिपक माळी, तालुका सोशल मीडिया प्रमुख राहुल माळी, संघटक गौरव माळी, मयूर माळी, संपर्कप्रमुख प्रमुख राकेश माळी, प्रसिद्धीप्रमुख अमोल माळी, सोशल मिडिया प्रमुख हर्षल माळी, संपर्कप्रमुख राकेश माळी, तालुका संघटक शशिकांत राऊळ, स्वप्निल माळी, राहुल माळी, शुभम माळी, योगेश माळी, तालुका सोशल मीडिया प्रमुख तुषार माळी, मयूर माळी, विशाल माळी आदी उपस्थित होते. त्याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर कार्याध्यक्ष नरेंद्र महाजन यांनी आभार तालुका सचिव दिपक माळी यांनी मानले.

Exit mobile version