Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोदावरी आयएमआर महाविद्यालयातर्फे एमआयडीसी परिसरात वृक्षारोपण

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च (आयएमआर) महाविद्यालयाने महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून एमआयडीसी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

 या कार्यक्रमास रोटरी क्‍लब ऑफ जळगाव इलाईटच्या सदस्यांना आमंत्रित केले होते. आयएमआर महाविद्यालयाचे संचालक डॉ.प्रशांत वारके यांनी रोटरी क्‍लब ऑफ जळगाव इलाईटचे अध्यक्ष नितीन इंगळे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. सचिव संदिप असोदेकर यांचे स्वागत प्रा.एम.के.गोडबोले यांनी केले. रोटरी क्‍लब ऑफ जळगाव इलाईटचे अध्यक्ष नितीन इंगळे यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ.प्रशांत वारके यांनी विविध झाडांबद्दल माहिती दिली व त्याचे महत्व पटवून दिले. वातावरणात ऑक्सीजन निर्माण करण्यासाठी झाडे महत्वाची आहेत. तसेच जमिनीची गुणवत्‍ता व हवेची गुणवत्‍ता सुद्धा वाढविली जाते हे पटवून दिले. या वेळी वड, पिंपळ, कडूलिंब, गुलमोहर इत्यादी वृक्षारोपण एमआयडीसी परिसरात केले. 

सूत्रसंचालन प्रा.अश्‍विनी सोनवणे यांनी केले. यावेळी रोटरी क्‍लब ऑफ जळगाव इलाईटचे सदस्य लक्ष्मीकांत मणियार, डॉ.वैजयंती पाध्ये, राजीव बियाणी, भुपेंद्र वाणी, सचिन पाटील, श्रीराम परदेशी, अनिल महाजन, चंदन कोल्हे यांच्यासह महाविद्यालयाचे संचालक डॉ.प्रशांत वारके, डॉ.निलीमा वारके, प्रा.मकरंद गोडबोले, प्रा.चेतन सरोदे, प्रा.प्राजक्‍ता पाटील, डॉ.अनुभूती शिंदे, प्रा.भाग्यश्री पाटील, प्रा.आफरीन खान, प्रा.अश्‍विनी सोनवणे, प्रा.श्रृतिका नेवे यांच्यासह शिक्षकेत्‍तर कर्मचारी उपस्थीत होते.

Exit mobile version