विवरे गावात वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील विवरे गावात वटपौर्णिमेनिमित्त विविध प्रकारच्या ६०० रोपांचे रोपण करण्यात आले आहे.

आज विवरे (ता: धरणगाव जिल्हा: जळगांव) गावात वटपौर्णमेच्या पावन पर्वावर महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वांसमोर एक आदर्श ठेवला. तो असा दरवर्षी गावातील सर्व महिला वर्ग परंपरेप्रमाणे वटवृक्षाला धागे बांधून पतिव्रतेचे वचन देतात. पण या बदलत्या काळात पर्यावरणाचे देखील रक्षणाचे वचन प्रत्येकाने करावे. म्हणुनी गटातील सर्व महिला प्रत्येकी एक वटवृक्ष लावून आणि त्याचे संरक्षण करून घेऊया असा निर्धार केला.

त्या निमित्त विवरे गावाच्या गावठाण परिसरात अंदाजे  ५००/६०० विविध प्रकारचे वृक्ष लावण्याच्या कार्यक्रमाला आज पासून वटपौर्णमेच्या निमित्ताने सुंदर अशी सुरुवात केली.

विशेष म्हणजे गावातील स्वामी समर्थ गटातील सदस्य भिकुबाई संतोष माळी यांनी स्वखर्चाने ५०० वृक्षारोप देण्याचे प्रतिपादन दिले. यानिमित्त विवरे गावातील सर्व महिला बचत गटातील महिला तसेच CRP जयश्री पाटील,  कृषिसखी रंजना पाटील गावातील. सर्व तरुण वर्ग यांचे ही मोलाचे योगदान ठरले.

 

Protected Content