Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कारमधून गुटखा, तंबाखू व पानमसाल्याची वाहतूक

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील चोपडाई रोडवरून कारमधून गुटखा, तंबाखू व पानमसाल्याची वाहतूक करणाऱ्या कारवर अमळनेर पोलीसांनी रविवारी २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता कारसह २ लाख ७३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील चोपडाई रोडवरून कार क्रमांक (एमएच १४ ईयू ५५६२) मधून बेकायदेशीरित्या गुटखा, तंबाखू व पानमसाल्याची वाहतूक होत असल्याचा गोपनिय माहिती अमळनेर पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी रविवारी २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता चोपडाई रोडवर कारवाई केली. त्यावेळी पोलीसांनी कारची तपासणी केली असता कारमधे गुटखा, तंबाखू व पानमसाला मिळून आला. पोलीसांनी कारसह मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात कार चालक अमोल अशोक पवार वय ४१ रा. बोराडी ता.शिरपूर जि.धुळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे ह्या करीत आहे.

Exit mobile version