Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईनगर तालुक्यात विनापरवाना गौण खनिजाची वाहतूक; कारवाईची मागणी

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील गौण खनिज उत्खननावर प्रशासनाने कारवाई केली. परंतू, नायगाव ते नंदू पिंपरी दरम्यान कोणत्याही प्रकारचे उत्खनन व सपाटीकरण व वाहतूक करण्यास परवानगी नसतांना सर्रास माती वाहतुक होत असल्याचे चित्र दिसत आहे.

गेल्या दोन ते तीन महिन्यात पासून मुक्ताईनगर तालुक्यात अवैध गौण खनिज व वाळू वाहतुकी वर सतत कारवाया सुरू असून महसूल प्रशासन तसेच पोलीस प्रशासन यांनी गौण खनिज माफियांच्या झोपा उडवल्या तसेच पोलीस प्रशासनाने मोठ्या कारवाया करीत ट्रॅक्टर वाहतूक करीत असताना चालक-मालक सह गुन्हा दाखल करीत महसूलचा दंड ठोठावला असल्याने गौण खनिज माफियांच्या झोपा उडाल्या आहेत. यामुळे त्यांच्यात प्रशासनाचा वचक जो इतक्या वर्षांपासून दिसत नव्हता तो अद्याप तरी दिसून येत आहे. परंतु तालुक्यातील नायगाव ते दरम्यान गेल्या आठ ते पंधरा दिवस झाले. स्वतः दिवसाढवळ्या व रात्री देखील मोठ्या प्रमाणात शेत सपाटीकरणाच्या नावाखाली माती एका गटातून दुसऱ्या गटात सहज अधिकाऱ्यांच्या समोर वाहतूक केली जात आहे.

परंतु अधिकारी बघ्याची भूमिका घेत आहे, ही बाब महसूल प्रशासनाच्या अधिपत्याखाली येत नाही का, काही आर्थिक सहर्ष अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे. तसेच कार्यवाही झालेल्या ट्रॅक्टर यांना वेगळा कायदा व वाहतूक करणाऱ्या जेसीबीसह ट्रॅक्टर यांना वेगळा कायदा शासनाने लागू तर केला नाही ना असे अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. आतातरी त्यांच्यावर कार्यवाही होणार का ? तसेच मुक्ताईनगरचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक व तहसीलदार हे त्या जेसीबी व ट्रॅक्टर यांच्यावर कारवाई करणार का ? शासनाच्या कोणत्यातरी नियमाच्या पळवाटा शोधीत या माती माफियांना पाठीमागे घालणार असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे.

दरम्यान, मार्च एण्डच्या कामांमुळे सर्वच अधिकारी व कर्मचारी वर्ग व्यस्त असून त्यामुळे आज कारवाई होऊ शकली नाही परंतु यापुढे जर अशीच बाब आढळून आले तर नक्कीच कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन नायब तहसीलदार निकेतन वाळे यांनी दिले आहे.

Exit mobile version