Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पल्लवी सावकारेंच्या तक्रारी नंतर किन्ही येथील ग्रामसेविकेची बदली

जळगाव प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील किन्ही येथील ग्रामसेविकेने आजारपणाचे दिलेले प्रमाणपत्र हे बोगस असल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांनी केल्यानंतर या ग्रामसेविकेची अखेर बदली करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

याबाबत वृत्त असे की, किन्ही येथील ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर यांनी बदली रद्द करण्यासाठी बदली प्रक्रियेवेळी हृदयासंबंधीचे आणि पक्षाघाताचा त्रास असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले होते. प्रमाणपत्रानुसार बदली थांबवण्यात आली. मात्र ग्रामसेविकेने सादर केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र बोगस असून, पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांनी केली होती.

या तक्रारीची दखल घेत पुन्हा वैद्यकीय तपासणी झाली असता ग्रामसेविकेला आरोग्यविषयक कोणत्याही प्रकारची समस्या नसल्याचा रिपोर्ट देण्यात आला. यामुळे आधीचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे आढळून आल्याने ग्रामसेविकेची बदली करण्यात आली आहे. किन्ही येथून यावल तालुक्यातील चुंचाळे येथे बदली करण्यात आली आहे.

Exit mobile version