Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

टपाल कार्यालयात कोअरबँकिंग अंतर्गत व्यवहार करणे शक्य

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या नवीन अर्थसंकल्प 2022 धोरणानुसार कोणत्याही व्यक्तीला कोअर बँकिंग अंतर्गत टपाल कार्यालयाच्या माध्यमातून व्यवहार करता येणार आहे. अशी माहिती भुसावळ पोस्ट कार्यालयाचे उपअधीक्षक यांनी दिली.

 

 

केंद्र शासनाच्या नुकत्याच झालेल्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात पॅरा 60 खालीलप्रमाणे कोणत्याही टपाल कार्यालयात कोअरबँकिंग अंतर्गत व्यवहार करणे शक्य होणार आहे. कधीही, कुठेही टपाल कार्यालयात बचत २०२२  मध्ये, १.५ लाख पोस्ट ऑफिस 100 टक्के कोअर बँकिंग प्रणालीवर येणार आहेत. ज्यामुळे आर्थिक समावेश साध्य होऊ शकेल. तसेच नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एटीएम द्वारे खात्यांमध्ये या माध्यमातून व्यवहार करणे शक्य होईल. पोस्ट ऑफिस खाती आणि बँक खाती यांच्यामध्ये निधीचे ऑनलाइन हस्तांतरण देखील शक्य होईल. यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी इंटर-ऑपरेबिलटी आणि आर्थिक समावेशन सुविधा उपलब्ध होणार असल्याचेही पोस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

Exit mobile version