Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षणाची संधी – इच्छुकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये साथीच्या रोगाशी संबंधित उध्दभवलेल्या परिस्थितीत आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक युवकांना भारत सरकारव्दारा प्रधानमंत्री कौशल्य विकास प्रशिक्षण 3.0” योजनेंतर्गत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.

आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रातील संसाधनांमधील आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा दूर व्हावा, याकरिता आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक युवक-युवतींना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध आहे. हेल्थकेअर क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी भारत सरकारव्दारा प्रधानमंत्री कौशल्य विकास प्रशिक्षण 3.0” योजना राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 18 ते 45 वयोगटातील एकूण 150 बेरोजगारांना शासकीय आर्युवेद महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार असून हे प्रशिक्षण ऑन जॉब ट्रेनिंग स्वरुपाचे असेल. प्रशिक्षणानंतर प्रशिक्षित उमेदवारांना शासनातर्फे प्रमाणपत्र प्राप्त होणार असून त्यान्वये त्यांना आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या प्रशिक्षणासाठी इच्छूक उमेदवारानी खालील गुगल लिंक वर आपली माहिती/नोंदणी ऑनलाईन सादर करावी. असं आवाहन सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता श्री. वि. जा. मुकणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

गुगल लिंक :-
https://docs.google.com/forms/d/e/IFApQLSf_xxXoWjGQeQeNZIQVD_५uCCnRIVcy६५ruvUsxMBbxy२jL_g/viewform?usp=pp_url

Exit mobile version