Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘प्रज्वला’ उपक्रम अंतर्गत 27 जून रोजी जळगावात महिला बचतगटांचे प्रशिक्षण

download 4

 

जळगाव (प्रतिनिधी) ‘प्रज्वला’ उपक्रमाची घोषणा वित्त व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत 1 फेब्रुवारी, 2019 रोजी मुंबईत करण्यात आली होती. मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र राज्‍य महिला आयोग राज्यभरातील महिला बचत गटांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देणार आहे. याचा शुभारंभ नंदुरबार जिल्ह्यात 15 जून, 2019 रोजी श्रीमती विजया रहाटकर, अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या हस्ते आज करण्यात आला आहे.

राज्यातील महिला बचत गटांना प्रज्वला अतंर्गत प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येणार असून हे प्रशिक्षण जळगाव जिल्ह्यात 27 जून रोजी होणार असल्याचे डॉ. मंजूषा मोळवणे, सदस्य सचिव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. जिल्हानिहाय महिला बचतगटांचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम पुढील प्रमाणे :- धुळे शहर आणि शिंदखेडा 16 जुन, नाशिक मध्य आणि नाशिक पूर्व-पश्चिम 17 जून, वर्धा 21 जुन, चंद्रपुर 22 जुन, गडचिरोली 23 जुन, जळगाव 27 जुन, कोल्हापूर 2 जुलै, सांगली 3 जुलै, सातारा 4 जुलै, बुलढाणा 5 जुलै, वाशिम 5 जुलै, पालघर 9 जुलै, हिंगोली 8 जुलै, परभणी 9 जुलै, नांदेड 10 जुलै, नागपूर 15 जुलै, भंडारा 16 जुलै, गोंदिया 17 जुलै, औरंगाबाद व बीड जिल्हे 22 ते 25 जुलै, जालना 29 जुलै, लातूर 30 जुलै आणि अमरावती व अकोला 31 जुलै, 2019 रोजी होणार आहे. एका जिल्ह्यात दोन ते तीन कार्यक्रम होणार असून याबाबतचा सविस्तर कार्यक्रम संबंधितांना कळविण्यात येणार असल्याचे आयोगाच्या सदस्य सचिव, डॉ. मंजुषा मोळवणे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Exit mobile version