Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बायकोला कार शिकवतांना पडली विहिरीत : माय-लेक ठार !

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे आज एक अतिशय भयंकर घटना घडली असून यात माय-लेकीला प्राण गमवावे लागले आहेत.

देऊळगावराजा येथील रामनगर मध्ये राहणारे शिक्षक अमोल मुरकुटे हे आपली पत्नी स्वाती मुरकुटे ला कार शिकवत होते. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी सिद्धी मुरकुट वर्ग पाचवा ही सुद्धा सोबत होती. दरम्यान कार शिकवित असताना चिखली रोडवर जात असताना कार वरील ताबा सुटल्याने कार सरळ 70 फुट खोल विहिरीमध्ये पडली.

यामध्ये अमोल मुरकुट खिडकीमधून कसेबसे बाहेर आले. मात्र स्वाती मुरकुटे व मुलगी सिद्धी मुरकुट यांचा मात्र पाण्यामध्ये मृत्यू झाला आहे. अमोल मुरकुटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून स्वाती मुरकुट व सिद्धी मुरकुट यांचा मृतदेह शोधण्यात येत असून अग्निशमन गाडी, पोलीस ताफा घटनास्थळी दाखल आहे..

एकीकडे रस्ते अपघातात सध्या जिल्ह्यामध्ये मलिका सुरू असताना आता पुन्हा एकदा आज गाडी शिकवण्याच्या नादामध्ये आपल्या पत्नी व मुलीला गमवायची वेळ आली आहे. तर एकंदरीत वाहन चालवताना व शिकताना देखील सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

Exit mobile version