Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोरीला गेलेला माल परत मिळावा यासाठी व्यापाऱ्यांचे अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील व्यापारी यांचा रेडीमेड कपड्यांचा माल ‘साईनाथ ट्रान्सपोर्ट’चे मालक साईनाथ साहेबराव काळे यांचे ट्रान्सपोर्ट गाडीतून चोरी झाल्याबद्दल जळगाव होलसेल रेडीमेड, होजअरी व कपडा असोसिएशन व्यापारी यांनी जळगावचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना निवेदन देण्यात आले आहे

जळगाव शहरातील व्यापारी यांनी या निवेदनात, ” आमचा रेडिमेट कपड्यांचा व्यवसाय असून आम्ही ‘साईनाथ ट्रान्सपोर्ट ‘यांच्याकडे ३१ जानेवारी २०२२ रोजी रात्री ८ वाजेच्या दरम्यान त्यांच्या ताब्यात दिला होता. सदर उमाळा, जाफराबाद, भोकरदन, फुलंब्री, सिल्लोड येथे व्यापाऱ्यांकडे जाणार होता. मालातून ५२ ते ६० पार्सल पोलीस रेल्वे स्टेशनच्या हद्दीमध्ये चोरी करण्यात आले असून बाकी उर्वरित मालगाडीमध्ये जमा असल्याची फिर्याद ट्रान्सपोर्टचे मालक साईनाथ काळे यांनी दिनांक १ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता दिली.”

चोरीला गेलेला माल व आरोपी लवकर शोधून सदर माल संबंधित व्यापारी बांधवांना मिळवून द्यावा आणि आरोपीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जळगाव होलसेल रेडीमेड, होजअरी व कपडा असोसिएशन व्यापाऱ्यांच्या वतीने चंद्रकांत गवळी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Exit mobile version