Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बी.जे.मार्केटमधील ट्रेडर्स दुकान फोडून मुद्देमाल लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बी.जे. मार्केट मधील गुरूनानक ट्रेडर्स दुकान फोडून रोकडसह सामान असा एकुण १ लाख ५४ हजारांची मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रविवारी २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव शहरातील सिंधी कॉलनीतील कंवर नगरातील रहिवाशी प्रदीप नानकराम रामचंदानी (वय-४०) रा. कंवर नगर, सिंधी कॉलनी, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांचे बी.जे.मार्केट परिसरात गुरूनानक ट्रेडर्स नावाचे सबमर्शिबलचे स्पेअर पार्टसचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे २० ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता प्रदीप रामचंदानी यांनी दुकान बंद करून घरी गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उघडवून दुकानातील ९ हजाराची रोकड आणि दुकानातील सामान असा एकुण १ लाख ५४ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले. प्रदीप रामचंदानी यांनी तीन दिवसांनंतर रविवारी २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Exit mobile version