शहरात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पिंप्राळा परिसरातील सोमाणी मार्केट जवळून विनापरवाना वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टरवर पोलीसांनी कारवाई केली. वाळूने भरलेले ट्रॅक्टर पोलीसांनी जप्त केले असून चालकावर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, “रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोहेकॉ संजय सपकाळे, पोहेकॉ सुशील चौधरी हे पिंप्राळा परिसरातील सोमाणी मार्केट परिसरात बुधवार, दि. १ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास बाजारात बंदोबस्तासाठी हजर होते.

त्यावेळी मढी चौकाकडून सोमाणी मार्केटकडे वाळूने भरलेले विना क्रमांकाचे ट्रॅक्टर जात असतांना पोलीसांनी पकडले. वाळू वाहतूकीचा परवाना विचारले असता ट्रॅक्टर चालक शुभम जयसिंग पाटील (वय-२७) रा. मढी चौक, पिंप्राळा जळगाव याने तापी नदीतून वाळू चोरून आणल्याचे सांगितले. पोलीसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त केले.

याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक शुभम पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content