Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाळूने भरलेले ट्रॅक्टर पोलीसात जमा; एकावर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील निमखेडी गावाजवळील रोडवरून वाळूची अवैधरित्या वाहतूक करणारे ट्रॅक्टर तालुका पोलीसांनी पकडले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.

 

तालुका पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील निमखेडी गावातून अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याची माहिती जळगाव तालुका पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपअधिक्षक आप्पासो पवार यांनी दिलेल्या सुचनेनुसार पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी १ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता निमखडे गावानजीकच्या रोडवर कारवाई केली. यावेळी विना क्रमांकाचे ट्रॅक्टर पोलीसांनी पकडले. वाळू वाहतूकीचा परवाना विचारला असता कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर पोलीसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त केले. पोलीस कॉन्स्टेबल जयेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक आनंद यशवंत पाटील (वय-३०) रा. निमखेडी ता.जि.जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रामकृष्ण इंगळे करीत आहे.

Exit mobile version