Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील धानोरा ते दापोरा रोडवरून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरवर जळगाव तालुका पोलीसांनी कारवाई केली. यात ट्रॅक्टरचालक वाहन सोडून पसार झाला होता. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव तालुक्यातील धानोरा ते दापोरा गावाच्या दरम्यान असलेल्या रोडवरून बुधवारी २३ ऑगस्ट रोजी साडेआठ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टरमधून वाळू वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती जळगाव तालुका पोलीसांना मिळाली. त्यानुसार प्रभारी अधिकारी परिविक्षाधिन पोलीस  उपअधिक्षक आप्पासो पवार यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. पथकाने सापळा रचून वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर आडविले. पोलीसांना पाहून अनोळखी ट्रॅक्टर चालक हा वाहन सोडून पसार झाला होता. दरम्यान पोलीसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त केले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल भुषण सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरीवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे करीत आहे.

Exit mobile version