Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावातील गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर धरणगाव पोलीसांनी पोलीसांनी पकडले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर मालक व चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावानजीक असलेल्या गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती धरणगाव पोलीसांना मिळाली. त्यानुसार पथकाने बुधवार २० मार्च रोजी पहाटे ५.३० वाजता कारवाई करत वाळूने भरलेले ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ सी ९५७७) बांभोरी गावातून नेत असतांना पोलीसांनी पकडले. त्यांच्याकडे वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना आढळून आला नाही. त्यामुळे पोलीसांनी वाळूचे ट्रॅक्टर जप्त केले. याप्रकरणी सकाळी ११ वाजता पोलीस कॉन्स्टेबल अमोल धोबी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक पंकज वसंत तायडे रा. निमगाव ता. यावल आणि ट्रॅक्टर मालक दिनेश भागवत नन्नवरे रा. बांभोरी ता. धरणगाव यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन महाजन हे करीत आहे.

Exit mobile version