Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा यात्रा रद्द

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सैलानी बाबा यात्रा रद्द होत असून यंदा ही यात्रा रद्द करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सैलानी यात्रा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव सराई येथे दरवर्षी भरणारी सैलानी बाबांची यात्रा सलग तिसऱ्या वर्षी ही रद्द करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण पाहता खबरदारीचा उपाय म्हणून तथा साथरोग प्रतिबंधक कायदा तथा आपत्ती व्यवस्थानप कायद्याचा आधार घेत जिल्हाधिकारी एस रामास्वामी यानी या यात्रेस स्थगिती दिली आहे.

या यात्रेत राज्यासह देशभरातून जवळपास पाच ते सहा लाख भाविक येत असतात. यात्रा सुरू ठेवल्यास कोरोनाची बाधा सर्वत्र मोठ्या प्रमाणावर होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे हा यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.

यावेळी पोलिस प्रशासनाने दर्गा बंद करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाला केली आहे. गेल्या वर्षी यात्रा रद्द झाल्यानंतरही अनेक भाविक सैलानी यात्रेत पोहोचत होते. त्यामुळे पोलिस, महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाला मोठी कसरत करून भाविकांना आल्या पावली परत पाठवावे लागेल होते.

Exit mobile version