Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोटारसायकलवर निर्जनस्थळी नेऊन महिलेवर अत्याचार

भुसावळ प्रतिनिधी ।  शहरातील दगडी पुलाजवळून लाल रंगाच्या मोटारसायकलवर अज्ञात इसमाने महिलेला बसून जळगाव रोड मार्गाकडे वाय पॉईन्ट जवळील पेट्रोल पंपाकडून उड्डाण पुलाकडून मोटरसायकलवर निर्जनस्थळी नेऊन महिलेला मारहाणसह अत्याचार केला. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, अज्ञात इसमाच्या तावडीतुन महिला पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना अज्ञात इसमाने दिनांक २२/२/२०३१ रोजी रात्री ९.३० ते ११.३० वाजेच्या दरम्यान महिलेस चपटा- बुक्यांनी मारहाण केली व महिलेस खालीपाडून तिच्या विरुद्ध अंगावरील कपडे फाडून शारीरिक अत्याचार केला. यानंतर अज्ञात इसमाने मोठा दगड उचलून महिलेच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न करीत असतांना महिलेने वार चुकविला म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरुन ८२/२०२१ भादवि कलम ३६३,३७६,३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. घटनास्थळी मा.पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी भेट दिली असून गुन्ह्याचा पुढील तपास बाजारपेठ ठाण्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक,पोना किशोर महाजन, स.फै.सुनील सोनवणे,पोहेकॉ अनिल पाटील करीत आहे.

 

Exit mobile version