Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उद्या मधुकर माळी (रोकडे) यांच्या प्रचारास होणार प्रारंभ

bjp

धरणगाव,प्रतिनिधी | येथील नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची निवडणूक २९ डिसेंबर रोजी होत आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवारी मधुकर बन्‍सी माळी (रोकडे) यांना देण्यात आलेली आहे. त्यांच्या प्रचाराचा नारळ वाढविण्याचा कार्यक्रम शुक्रवार २० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.

भारतीय जनता पार्टी व आरपीआय (आठवले गट) महायुतीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मधुकर बन्सी माळी (रोकडे) यांच्या प्रचाराचा नारळ वाढविण्याचा कार्यक्रम उद्या शुक्रवार २० डिसेंबर रोजी श्री बालाजी महाराज मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ८.३० वाजता नारळ वाढविण्यात येणार आहे तरी भारतीय जनता पार्टी, आरपीआय (आठवले गट) सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक, विविध आघाड्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक बंधू भगिनींनी मोठया संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती भाजयुमो अध्यक्ष कांतीलाल माळी,  भाजयुमो सरचिटणीस सचिन पाटील , भाजपा , सरचिटणीस सुनील चौधरी , कैलास माळी, भाजपा शहराध्यक्ष सुनिल वाणी , आरपीआय अध्यक्ष गणेश शामराव सोनवणे, आरपीआय जिल्हा सचिव मिलिंद शंभू पवार, आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन बाबा सोनवणे तसेच  भारतीय जनता पार्टी व आरपीआय (आठवले गट) धरणगावतर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version