Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात उद्या श्री. बालाजी मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पाचोरा शहरातील रथगल्ली येथे उद्या 3 ते 6 मे दरम्यान श्री. बालाजी मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा होणार आहे. 8 मे रोजी सकाळी १०:३० ते दुपारी 3 या वेळेत भाविकांना महाप्रसादाचा लाभ मिळणार आहे.

पाचोरा येथील सुमारे १८९ वर्ष पुरातन श्री. बालाजी महाराज मंदीर जिर्णोध्दाराचे काम पुर्ण झाले असुन जिर्णोध्दार सोहळा श्री बालाजी मंदीर, रथगल्ली, पाचोरा येथे अक्षयतृतीया या मुहूर्तावर दि. ३ मे  ते दि. ६ मे या कालावधीत सकाळी ८.०० ते सांयकाळी ६.०० पावेतो विविध धार्मिक विधी संपन्न होणार आहेत.

दि. ३ मे रोजी दुपारी प्रायश्चित्त / संकल्प पुजन, सांयकाळी ५.३० वाजता श्री. बालाजी महाराज ग्रामप्रदक्षिणेकरिता – श्री. बालाजी मंदिर – श्री. विठ्ठल मंदिर – चावडी – जामनेर रोड – श्री. महादेव मंदिर – श्री. जैन मंदिर – गांधी चौक ते परत श्री. बालाजी मंदिर (सहभाग श्री. गो. से. हायस्कूल), दि. ४ मे रोजी सकाळी ८ वाजता श्री. गणेश पुजन, पुण्याहवाचन, मातृका पुजन, नांदीश्राद्ध, श्री. बालाजी महाराज जलाभिषेक, सांयपुजन, ध्याननिवास, आरती, रात्री ८ वाजता श्री. देविदास थोरात यांची भजन संध्या, दि. ५ मे रोजी सकाळी ८ वाजता मंडळ स्थापन, अग्नी स्थापन, तुलसी अर्चन फळ अर्चन, ग्रहयज्ञ हवन, शांतीक पुष्टीक होम, प्रसाद वास्तु स्थापन, सांयपुजन, शय्यानिवास, आरती, रात्री ८ वाजता जळगांव येथील सत्संग भजन मंडळाचे संगीतमय सुंदरकांड दि. ६ मे रोजी सकाळी ८ वाजता प्रातपुजन, श्री. बालाजी महाराज मुर्ती स्थापना, कलशारोहन, कलश स्थापन, मुर्ती न्यास, कौतुक सुत्र, स्थापित हवन, बलीदान, पुर्णाहुती, महाआरती महानैवेद्य, ५६ भोग, ब्राह्मण पुजन, दक्षिणा, सांगता रात्री ८.०० वाजता दिपोत्सव इ कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

तसेच दि. ८ मे रोजी सकाळी १०:३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन वजा विनंती श्री बालाजी मंदीर संस्थान, पाचोरा यांचे मार्फतकरण्यात येत आहे.

Exit mobile version