Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघासमोर मोठी आव्हाने

tokyo olympics 2020 jpg

मुंबई वृत्तसंस्था । २०२० वर्षी जपानमधील टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघासमोर कठीण आव्हान असेल. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय हॉकी संघाने ऑलिम्पिकसाठी गट जाहीर केले. या गटात भारतीय पुरुष संघाचा समावेश असून, भारताला माजी ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेते अर्जेंटिना व ऑस्ट्रेलिया यासारख्या मोठ्या संघाशी आव्हान असेल.

दुसरीकडे महिला हॉकी संघाचा समावेशही “अ” गटात करण्यात आला असून या गटात भारतीय महिलांना नेदरलँड, जर्मनी, ग्रेट ब्रिटन या प्रतिस्पर्ध्यांशी सामना करायचा आहे. नोव्हेंबर महिन्यात भुवनेश्वर शहरात झालेल्या ऑलिम्पिक पात्रता फेरीत भारतीय पुरुषांनी रशियावर तर महिलांनी अमेरिकेवर मात करत, ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळवले होते. त्यामुळे आगामी स्पर्धेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Exit mobile version