संसर्ग कायम : जिल्ह्यात आज १११५ बाधित आढळले तर ११०३ झाले कोरोनामुक्त

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात १ हजार ११५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १ हजार १०३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज जळगाव शहरासह चोपडा आणि भुसावळ तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग वाढलेला दिसून येत आहे. आजही २१ रूग्णांचा मृत्यू झालाय.

जिल्हाभरातील आजची आकडेवारी

जळगाव शहर-२६०, जळगाव ग्रामीण-१५, भुसावळ-२१३, अमळनेर-१७, चोपडा-१२२, पाचोरा-३६, भडगाव-१०, धरणगाव-४५, यावल-३८, एरंडोल-५८, जामनेर-६५, रावेर ७७, पारोळा-३१, चाळीसगाव -४६, मुक्ताईनगर-४२, बोदवड-३४ आणि इतर जिल्हे ८ असे एकुण १ हजार ११५ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालात जिल्ह्यात एकुण १ लाख ८ हजार २१८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ९५ हजार ०७९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ११ हजार २३० रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरातून एकुण २१ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ५ रूग्ण चाळीसगाव तालुक्यातील आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Protected Content