Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर ग्रामीण रुग्णालयात तंबाखूमुक्तीबाबत जनजागृती

raver 1

रावेर प्रतिनिधी । येथील ग्रामीण रुग्णालयात आज 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय तंबाकू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखू मुक्तची शपथ घेण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निषा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा गांधीजींच्या प्रतिमा पूजन श्रीराम फॉउडेशन सचिवांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. प्रियंका यांनी प्रास्ताविकात तंबाखूमुळे होणारे आजार आणि त्यापासून होणारे दुष्परिणाम याविषयावर मार्गदर्शन केले. यावेळी कुशल पाटील, गणेश महाजन, अर्चना पाटील, शंकर भोई, गोविंद पवार, पी.एस गायकवाड, रफिक तडवी यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्ण व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्य अधिपरिचरिका कल्पना नगरे यांनी केले. आभार प्रदर्शन के.डी. झोपे यांनी मानले.

Exit mobile version