Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एक्झिट पोल ईव्हीएममध्ये फेरफार करण्यासाठीच : ममता बॅनर्जी

mamata banerjee pti 875

 

कोलकाता (वृत्तसंस्था) ‘एक्झिट पोलवर माझ्या विश्वास नाही, कारण अशा रणनितीचा वापर फक्त ईव्हिएममध्ये घोटाळा करण्यासाठी केला जातो’, असे बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे.

 

काल लोकसभेसाठी सातव्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावरुन ममता बॅनर्जी ट्विटरवर म्हणाल्या, ‘मी एक्झिट पोलवर विश्वास ठेवत नाही. अशा प्रकारची रणनिती हजारो ईव्हिएममध्ये फेरफार करण्यासाठी वापरली जाते. मी सर्व विरोधी पक्षांना एकजूट, मजबूत आणि धाडसी राहण्यासाठी आवाहन करत आहे. आम्ही ही लढाई एकत्र लढवू’. दरम्यान, सर्व एक्झिट पोलच्या सरासरीनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपाला अंदाजे 12 ते 15 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर तृणमूल काँग्रेसला 23 ते 26 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. डाव्या पक्षांना खातेही उघडता येणार नाही, असा अंदाज असून काँग्रेसला एका जागेवर विजय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Exit mobile version