Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सी.ए.ए. अन एन.आर.सी. विरोधात जळगावात उद्या भव्य रॅलीचे आयोजन

 

जळगाव, प्रतिनिधी | केंद्र सरकारने आणलेला सी.ए.ए. कायदा तसेच एन.पी.आर. नोंदणी व एन.आर.सी. हा प्रस्तावित कायदा रद्द करावा या मागणीसाठी उद्या (दि.७) शहरात सकाळी ११.०० वाजता संविधान बचाव नागरी कृती समितीतर्फे खान्देश मॉल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या रॅलीत मराठा सेवा संघ, बुलंद छावा संघटना, संभाजी ब्रिगेड,शेतकरी संघटना, मराठा क्रांती मोर्चा,छत्रभारती विद्यार्थी संघटना, जळगांव मुस्लिम मंच, राष्ट्र सेवा दल, संविधान जागर समिती, विद्यार्थी भारतीय संघटना, राष्ट्रीय चर्मकार संघ,आदिवासी पारखी विकास परिषद, एकलव्य भील्ल संघटना, बहुजन वंचित आघाडी, सीव्हील सोसायटी, संविधान बचाव समिती, भुसावळ कोळी महासंघ, बहुजनस्यता परिषद, टोकरे कोळी संघर्ष समिती, भारतीय विद्यार्थी मोर्चा, एकलव्य क्रांतीदल, रमाई महिला मंडळ, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना, भगतसिंग विचार मंच, प्रहार बारा बलुतेदार संघटना, स्वाभीमानी शेतकरी संघटना,
सत्यशोधक विद्यार्थी संघटना, छावा मराठा युवा महासंघ, मौलाना आझाद मंच, स्व.नरेंद्र आण्णा पाटील फाऊंडेशन, आवाज परिषद, सत्यशोधक ओबीसी परिषद, जमियत उलमा हिंद, कुल जमाती कौसील जळगाव, जळगाव जिल्हा मनियार बिरादरी, आदिवासी तडवी भील्ल एकता मंच, भगतसिंग विद्यार्थी परिषद, कादरी फाऊंडेशन, लोकसंघर्ष मोर्चा, हम सब एज्युकेशन अॅण्ड वेलकर, नियाज़ अली फाऊंडेशन,अवसा बॉईज फाऊंडेशन, आदी संघटना सहभागी होणार आहेत.

Exit mobile version