Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पत्नीला घटस्फोट देण्याच्या दबावाला कंटाळून तरूणाने घेतला टोकाचा निर्णय; नऊ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पत्नीला घटस्फोट देण्याचासाठी तगादा, तिच्या पालन पोषणासाठी पैशांची मागणी आणि विवाहितेला छळ केल्याप्रकरणी कुटुंबावर गुन्हा दाखल … या सर्व गोष्टींचा त्रास शिवाय पत्नीच्या नातेवाईकांकडून वारंवर धमकी मिळत असल्याच्या तणावातून एका ३७ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आलीय. ही घटना आहे चोपडा तालुक्यातील हातेड गावातील.

योगेश उत्तमराव मोकाशे (वय-३७) रा. हातेडे बुद्रुक ता.चोपडा जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. याबाबत अधिक असे की, योगेश मोकाशे याचा विवाह भाग्यश्री उर्फ श्वेता हिच्या सोबत झालेला आहे. संसार चांगला सुरू असतांना मधुकर राजाराम पाटील, अनुपमा मधुकर पाटील, पवन मधुकर पाटील रा. करमाड ता.पारोळा, अश्विनी संदीप ठाकरे, संदीप ठाकरे रा. पुणे, पुनम गणेश पाटील, गणेश पाटील रा. पारोळा, राजेंद्र जगन्नाथ भदाणे, सुशिल जगन्नाथ भदाणे रा. बोरकुंड ता.धुळे यांनी वारंवार योगेशला फोन करण्यास सुरूवात केली. योगेशला धमकी देत पत्नी भाग्यश्रीला घटस्‍फोट देण्याची मागणी केली. त्यानंतर त्या बदल्यांत त्यांचे पालन पोषणासाठी पैसे देण्याची मागणी केली. पैसे दिले नाही तर आम्ही तुमच्या विरूध्द तक्रार करून अशी धमकी देण्यास सुरूवात केली. असे असतांना १८ सप्टेंबर रोजी पत्नी भाग्यश्री योगेश मोकाशे हिला पोलीसात पतीसह दीर, सासू सासरे यांच्या विरोधात महिला छळ प्रकरणात ४९८ केस देण्यात भाग पाडले. तसेच त्याच्या घरातील संसारोपयोगी वस्तू गाडीत भरून नेले. हा सर्व प्रकार घडल्यानंतर योगेश तणावात होता. पत्नीच्या नातेवाईकांकडून धमकी, पत्नीने पोलीसात दिलेली तक्रार आणि घरातून सामान घेवून गेल्याचा त्रास सहन न झाल्याने योगेश याने २१ सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान, मयताचा भाऊ महेश उत्तमराव मोकाशे याने चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.

त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी मधुकर राजाराम पाटील, अनुपमा मधुकर पाटील, पवन मधुकर पाटील रा. करमाड ता.पारोळा, अश्विनी संदीप ठाकरे, संदीप ठाकरे रा. पुणे, पुनम गणेश पाटील, गणेश पाटील रा. पारोळा, राजेंद्र जगन्नाथ भदाणे, सुशिल जगन्नाथ भदाणे रा. बोरकुंड ता.धुळे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करीत आहे.

Exit mobile version