सासरच्या जांचाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे हे पाऊल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील उस्मानियॉ पार्क येथील विवाहितेने सासरच्या जांचाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी समोर आली आहे. याप्रकरणीशहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सना तौसीफ मिस्तरी (वय-२१) रा. उस्मानियॉ पार्क, शिवाजी नगर, जळगाव असे मृत विवाहितेचे नाव आहे.

नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, सना तौसिफ मिस्तरी ही महिला आपल्या पती, सासू आणि सासरे यांच्यासह वास्तव्याला होते. गेल्या दोन महिन्यांपासून घरात कौटुंबिक वाद सुरू होतो. घरात होत असलेल्या कौटुंबिक वादासंदर्भात विवाहितेने तिचे वडील मजीद शेख सांडू यांना सांगितलेले होतते. गेल्या चार दिवसांपुर्वीच सनाने आपल्या आईवडीलांशी शेवटचे बोलणे झाले होते. मंगळवारी २८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री सर्वजण झोपलेले असतांना विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी १ मार्च रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आली. दरम्यान, पतीसह सासरच्या मंडळींच्या त्रासातून मुलीने आत्महत्या केली असा आरोप विवाहितेचे वडील मजीद शेख सांडू व आई शबाना मजीद शेख सांडू यांनी पत्रकारांशी बोलतांना केला आहे. सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी मुलीकडील नातेवाईकांनी केले आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात माहेरकडील नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र सोनार करीत आहे.

Protected Content