सततच्या नापिकीला कंटाळून तरूण शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील करंजा येथील तरूण शेतकऱ्याने सततच्या नापिकी व कर्जबाजारीतून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी १८ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

शरद जगन्नाथ पाटील (वय-३९) रा. करंजा ता.जि.जळगाव असे मृत तरूण शेतकऱ्याचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, शरद पाटील हे शेतकरी पत्नी व दोन मुलांसह जळगाव तालुक्यातील करंजा येथे वास्तव्याला होते. शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. शेतात मका आणि केळीची लागवड केली आहे. यासाठी त्यांनी सोसायटी आणि पीक कर्जच्या माध्यमातून शेती केली होती. सततच्या नापिकी आणि कर्जबाजारीतून ते सतत विवंचनेत होते. बुधवारी १८ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. पत्नी अनिता ह्या सकाळी उठल्यावर हा प्रकार दिसून आल्याने त्याना धक्का बसला. शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांच्या मदतीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी अनिता, लोकश आणि सुमित हे दोन मुले, लहान भाऊ प्रदीप असा परिवार आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Protected Content