Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुर्धर आजाराला कंटाळून तरूणानं केलं अस काही..

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुर्धर आजाराला कंटाळून तांबापूरा येथील एका ४२ वर्षीय प्रौढ व्यक्तीने  राहत्या घरामध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना मंगळवारी २ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास  उघडकीस आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सतिष बाबुराव ससाणे असे मृत व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सतिष ससाणे हे तांबापुरा येथे पत्नी, दोन मुले आणि मुलगीसह वास्तव्यास होते. मिळले ती हातमजुरी करून ते कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून ते एका दुर्धर आजारापासून त्रस्त होते. मंगळवारी २ जानेवारी रोजी सकाळी पत्नी कामावर तर मुले बाहेर गेले होते. त्यामुळे ते घरी एकटेच होते. सकाळी पुतण्याला त्यांनी नाश्ता घेण्यासाठी पाठविले. याच दरम्यानात त्यांनी राहत्या घरामध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. साडेदहा वाजेच्या सुमारास पुतण्या नाश्ता घेवून आल्यावर त्याला काका सतिष ससाणे यांनी गळफास घेतल्याचे दिसताच, त्याने आरडा-ओरड केली. यानंतर आसपासच्या रहिवाशांची गर्दी झाली होती. ससाणे यांना लागलीच खाली उतरवून जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकिय अधिका-यांनी तपासणीअंती मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version