Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काळाचा घाला : पाय घसरून पडल्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विहिरीतून पाणी काढतांना पाय घसरून पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना तालुक्यातील कळमसरा येथे घडली आहे. याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हरी राजू मोरे (वय-२६) रा. कळमसरा ता. पाचोरा असे मृत तरूण शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हरी मोरे हा सोमवारी १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शेतासाठी फवारणी साठी आला होता. पाण्याची तहान लागल्याने हरी मोरे हा विहरीतून पाणी काढण्यासाठी गेले असता विहीरीजवळ चिखल असल्याने त्यांचा पाय घसरला व तो विहीरीत पडला. सदरचा प्रकार शेजारील शेतात काम करणाऱ्यांच्या लक्षात येताच हरि मोरे यांना विहीरी बाहेर काढण्यात आले. मात्र विहीरीत जास्त पाणी असल्याने हरि मोरे यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. हरि मोरे यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी हरि मोरे यांना मयत घोषित केले. मयत हरि मोरे यांचे पाश्चात्य वृद्ध आई, वडिल, दोन भाऊ असा परिवार आहे. अतिशय मनमिळाऊ व हसमुख स्वभावाचे हरि मोरे यांच्या अकस्मात मृत्यू झाल्याने कळमसरासह परिसरात शोककळा पसरली आहे. घटने प्रकरणी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Exit mobile version