बुलडाणा येथे अत्यावश्यक सेवेसाठी वेळेची मर्यादा

बुलडाणा प्रतिनिधी । राज्यात 20 एप्रिलच्या आदेशानुसार  ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. तसेच सदर कालावधीत कलम 144 (संचारबंदी) लागू करण्यात आली असून जिल्ह्यात या अत्यावश्यक सेवासाठी ही सकाळी 7 ते  11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली होती. 

मात्र पर्जन्यमान सुरू झाल्यानंतर कृषी निगडित दुकानांवर कृषी निविष्ठा खरेदीसाठी सदर वेळेत शेतकऱ्यांची गर्दी होवून कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतीशी निगडित असलेली कृषी सेवा केंद्र, शेतीशी संबंधित असलेली उत्पादने व वाहतूक सकाळी 7 ते सायं 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी  आदेश अन्वये परवानगी दिली आहे. मात्र या आस्थापनांनी कोविड १९ संदर्भातील सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे.

सदर आदेश  बुलडाणा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहणार आहे. वरील आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, भारतीय दंड संहिताच्या कलम 188 व इतर संबंधित कायदे व नियम यांच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिलेल्या आदेशात नमुद आहे

 

 

 

Protected Content