Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेनेच्या काही विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार

jalgaon Shivsena

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे जे आमदार गेल्या पाच वर्षात ‘मातोश्री’साठी नॉटरिचेबल राहिले. लोकसभेच्या निवडणुकीत कमी पडले आहेत. तसेच ज्यांच्याविरोधात पक्षांतर्गत तक्रारी आहेत, अशा पाच ते दहा विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार असल्याचे वृत्त आहे.

 

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोअर कमिटीने ही नावं निश्चित केली आहेत. शिवसेनेने या आमदारांच्या जागी दुसरे उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. परंतु पक्षात फूट पडू नये म्हणून हे आमदार कोण आहेत, याची माहिती उघड केली जात नाहीय. त्यांची नावं आताच बाहेर आली तर पक्षात मोठे बंड होण्याची शक्यता आहे. म्हणून शिवसेनाही सावध पवित्रा घेताना दिसत आहे. तसेच इतर विद्यमान आमदारांना मात्र हिरवा कंदील देण्यात आल्याचे वृत्त आहे.

Exit mobile version