Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरधाव कारने तिघा तरूणांना उडविले : दोघांची प्रकृती गंभीर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगावहून शिरसोली येथे दुचाकीने जात असलेल्या तीन तरूणांना भरधाव वेगाने जाणार्‍या कारने उडविले असून यात दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, शिरसोली येथील पियुष ताडे, किशोर काटोले आणि रोहित ताडे हे तीन विद्यार्थी एमएच-१९ सीएन ९१२७ क्रमांकाच्या दुचाकीवरून जळगाव येथून काम आटोपून घरी येत होते. रात्री दहा वाजेच्या सुमारास जैन इरिगेशनच्या जवळ एमएच१९ सीयू ८०९३ क्रमांकाच्या भरधाव वेगाने जळगावकडून शिरसोलीकडे जाणार्‍या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत या तिन्ही विद्यार्थ्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. यातील रोहित ताडे आणि किशोर काटोले या दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. या संदर्भात रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Exit mobile version