Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर शहरानजिक रिक्षा पलटी होऊन तीन महिला जखमी, एकाची प्रकृती गंभीर

रावेर प्रतिनिधी | रावेर शहरानजिक रिक्षा पलटी होऊन तीन महिला जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी घडली आहे. यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला जळगावला उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

या बाबत वृत्त असे की, “रावेर शहरातील मराठा मंगल कार्यालयानजिक एका अॅपे रिक्षाला कट मारल्याने रिक्षा पलटी झाली. यात रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथील तीन महिला जखमी झाल्या आहे.

यातील दोन महिला किरकोळ जखमी झाल्या असून एका महिलेस गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारार्थ जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले आहे

Exit mobile version