Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर्स जप्त

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  रावेर परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रक्टरे महसूल विभागाने केल्याने वाळू तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

या बाबत वृत्त असे की रावेर तसेच खिरवळ परिसरात रात्री दोनच्या सुमारास अवैध वाळु वाहतूक करणारे तीन ट्रक्टरे १) विना नंबर चेचेस नंबर  ९९उA०३४०००३२८ तसेच सलमान खान यांच्या मालकीच एमएच१९ एपी ५५९२ आणि  विना नंबर ट्रक्टर खिरवड गावात पकडण्यात आले आहे.

ही कारवाई तहसीलदार बंडू कापसे, प्रशिक्षणार्थी तहसीलदार मयूर कळसे, निवासी नायब तहसीलदार सजंय तायडे, मंडळ अधिकारी यासीन तडवी, मंडळ अधिकारी शेलकर, मंडळ अधिकारी जे. डी. भंगाळे तसेच खिरवळ तलाठी कोतवाल यांच्या टीमने रात्री दोनच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक विरुध्द कारवाई केली आहे.

यासोबत, केर्‍हाळा, पिंप्री परिसरातुन देखिल रात्रीच्या सुमारास भोकर नदीपात्रातुन मोठ्या प्रमाणात अवैध वाळु वाहतूक होत असते याकडे देखिल तहसील प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे..

Exit mobile version